Wednesday, January 23, 2019

माझी पंढरीची माय - Majhi Pandharichi Maay

To clear few things... I'm still an atheist and a staunch one... but ..... my head is not closed, its open to receive the ideas of world.

When I listened this song, I felt it goes beyond the lenses of theism and atheism.


Such purity, sublimity and selfless expressions are rare and are a treasure to preserve for ages to come.

Hence sharing it for all here.

Majhi Pandharichi Maay from marathi movie Mauli
माझी पंढरीची माय

ॐ पृथ्वी जल ब्रम्हाण्ड विठ्ठल जगतासी आधार विठ्ठल अवघाची साकार विठ्ठल हरीनामे झंकार विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल तू बाप तूच बंधू तू सखा रे तुच त्राता रे भूतली या पाठीराखा तूच आता अंधार यातनेचा भोवती हा दाटलेला रे संकटी या धावूनी ये तूच आता होऊन सावली हाकेस धावली तुजवीण माऊली जगू कैसे चुकलो जरी कधी तू वाट दावली तुजवीण माऊली जगू कैसे करकटावरी ठेवोनी ठाकले विटेवर काय माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय साजिरे स्वरूप सुंदर तानभूक हारपून जाय माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय ना उरली भवभयचिंता रज तमही सुटले आता भेदभाव कातरला रे तनमनात झरली गाथा तू कळस तूच रे पाया मज इतुके उमजुन जाता राऊळात या देहाच्या मी तुलाच मिरविन आता लोचनात त्रिभूवन आवघे लेकरांस गवसुन जाय माझी पंढरीची माय ,माझी पंढरीची माय अंतरा - संपू दे गा मोह मनीचा वासना सुटावी हो जन्म उभा चरणीची त्या वीट देवा व्हावी हो कळस नको सोनियाचा पायरी मिळावी हो सावळ्या सुखात इतुकी अोंजळी भरावी हो भाबडा भाव अर्पिला उधळली चिंता सारी हो शरण गे माय आता लागले चित्त हे तुझीया दारी हो विझल्या मनातली दिपमाळ चेतली बळ आज माऊली तुझे दे 'मी' तुज्यात विरता माझी राहीलीच अोळख काय माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय मी पणाच सोडून जाता या कुडीत उरले काय माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय पृथ्वी जल ब्रम्हाण्ड विठ्ठल जगतासी आधार विठ्ठल अवघाची साकार विठ्ठल भक्तीचा उद्गार विठ्ठल अंतरा २ अंतरी मिळे पंढरी ..सावळा हरी ..भेटला तेथ बोलला कुठे शोधीशी.. मला दशदिशी ..तुझ्या मी आत जाहलो धन्य ..ना कुणी अन्य .. सांगतो स्वये जगजेठी तेजात माखले प्राण ..लागले ध्यान.. उघडली ताटी ना उरली भवभयिंचता रज तमही सुटले आता भेदभाव कातरला रे तनमनात झरली गाथा हेऽऽऽऽऽऽ 'मी' तुज्यात विरता माझी राहीलीच अोळख काय माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय मी पणाच सोडून जाता या कुडीत उरले काय माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली रुप तुझे